भूम (प्रतिनिधी)- भूम शहरासह तालुक्यात यावर्षी गणेश बप्पा समाधानकारक वातावरण घेऊन आले आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक गणेश मंडळांनी तेवढ्याच उत्साही वातावरणात गणेश बपांची स्थापना करून आराधना सुरू केली आहे . शहरातील श्री चौंडेश्वरी तरुण गणेश मंडळाने 79 व्या वर्षात रक्तदान व नेत्र शिबिरा बरोबर  सामाजिक, धार्मिक कार्यक्रमानी उत्सवाला सुरुवात केली आहे.     

भूम तालुक्यातील सर्वाधिक जुने आणि मानाचा गणपती बप्पा म्हणजेच श्री चौंडेश्वरी तरुण गणेश मंडळ या मंडळाचे यावर्षी 79 वर्षे आहे.  या निमित्ताने  मंडळाच्या वतीने गणपती बप्पांच्या आगमनानंतर रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर घेतल आहे. याशिवाय सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक कार्यक्रम म्हणून संत ज्ञानेश्वर समाधी सोहळा हा देखावा आयोजित केला आहे. याशिवाय वृक्षारोपण आणि मिरवणुकी दरम्यान समाज प्रबोधन पर  कार्यक्रम आयोजित केले आहे. आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 79 रक्तदात्यांनी रक्तदान केले,  यामध्ये महिलांचाही तेवढाच सहभाग रक्तदान करण्यासाठी सहभाग दिसून आला. 55 नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला.

गणेश उत्सवादरम्यान आयोजित रक्तदान व नेत्र तपासणी शिबिरावेळी अध्यक्ष वैभव उपरे, उमेश ढगे, विठ्ठल बागडे, शाम वारे, पत्रकार शंकर खामकर, माजी नगरसेवक सागर टकले, नवनाथ रोकडे, गंगाराम भागवत, सुहास खारगे, योगेश आसलकर, सुरज फलके, सोमेश म्हेत्रे, अतुल उपरे, शाम बागडे,  ऋषिकेश कोकणे, प्रथम आसलकर, रोहित पाकले, राहुल होगाडे, दत्तात्रय भुजबळ, सागर बागडेसह अनेकजण कार्यरत होते.

 
Top