धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून बी.एस्सी भाग एक मधील विद्यार्थ्यांचे स्वागत आणि मराठी विभागातील कवी डॉ.अरविंद हंगरगेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी डॉ.हंगरगेकर यांनी बोलताना वरील उद्गार काढले.
आपण विद्यार्थी दशेत असताना शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असते. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे ऐकले त्या त्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचे कल्याण झाले. आई - वडील आणि शिक्षक हे कोणताच स्वार्थ ठेवून आपणाला मार्गदर्शन करत नाहीत तर त्यांनी निस्वार्थीपणे मार्गदर्शन करत असतात. म्हणून त्यांच्या आज्ञेचे पालन करावे असे ते म्हणाले. यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप देशमुख, डॉ.हरेश कांबळे, डॉ. मंगेश भोसले यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी बी.एस्सी भाग तीन मधील विद्यार्थ्यांनी बी.एस्सी भाग एक मधील विद्यार्थ्यांचे पेन देऊन स्वागत केले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सावता फुलसागर हे होते. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना डॉक्टर फुलसागर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.