तुळजापूर (प्रतिनिधी)- शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरचे मराठी विभाग प्रमुख मा.प्रा.डॉ.नंदकुमार मोरे व साविञीबाई फुले विद्यापीठ, पुणेचे मराठी विभाग प्रमुख मा.प्रा.डॉ.प्रभाकर देसाई यांनी नुकतीच दि.10 सप्टेंबर  रोजी,तुळजापूर जि.धाराशिव येथील मराठी विभागाला सदिच्छा भेट दिली. यावेळी मान्यवरांचा सत्कार प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.जीवन पवार यांचे मार्गदर्शनाखाली करताना तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर. येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.राजा जगताप, मराठी  विभागाचे प्रा.डॉ.अनंता कस्तुरे, कॉमर्स विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.नेताजी काळे, इंग्रजी विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.छाया दापके, ग्रंथपाल दिपक निकाळजे व महाविद्यालयातील गुरूदेव कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी नविन शैक्षणिक धोरण व अभ्यासक्रमावर चर्चा करण्यात आली.

 
Top