तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे सामाजिक शास्त्रे विभागांची तुतारी भित्तिपत्रिकांचा एकत्रित प्रकाशन सोहळा महाविद्यालयात संपन्न झाला, उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ जीवन पवार यांनी वरील प्रतिपादन केले, पुढे ते म्हणाले की, विद्यार्थी दशा ही ज्ञान गृहण करण्याची असते, त्या दृष्टीने सामाजिक शास्त्रातील स्थित्यंतरे विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे, आपल्या प्रदेशाचा इतिहास,समाज, राजनैतिक परिवर्तन, आर्थिक घडामोडींचे ज्ञान या विषयांचे ज्ञान समाजाला होणे आवश्यक आहे.यामुळेच संबंधित विभागाने तुळजापूर नगरीचे ऐतिहासिक महत्त्व, यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय विचार आणि महाराष्ट्र, मार्क्सवादी विचारधारा आणि सामाजिक शास्त्र व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने नवीन कर प्रणाली अशा संवेदनशील विषयावर आधारित तुतारी अंक विद्यार्थ्यांनी तयार केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागाचे प्रा.सिध्देश्वर सुरवसे यांनी केले, यावेळी प्रा.अमोल भोयटे,प्रा डॉ.मंत्री आर आडे, डॉ.सी.आर दापके प्रा.राजा जगताप, ग्रंथपाल दिपक निकाळजे यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा बाळासाहेब कुकडे यांनी तर आभार डॉ आबासाहेब गायकवाड यांनी मानले.