धाराशिव (प्रतिनिधी) - मागील दोन - तीन दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने झोडपले आहे. त्यामुळे ओढा, नदी व नाल्यांना पूर येऊन शेतात उभे असलेली पिके पाण्याखाली आली. तर शेतातील बांध देखील पाण्याने फुटून शेतातील उभ्या असलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या तडाख्याने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धाराशिव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी धाराशिव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे दि.3 सप्टेंबर रोजी केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेले आहे. त्यामुळे त्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी केली आहे. यावेळी धाराशिव तालुकाध्यक्ष विनोद वीर यांच्यासह सलमान शेख, सुभाष हिंगमिरे, अरुण कोळगे, बालाजी माने, रघुनाथ आकोस्कर, दयानंद केसकर, बंडू बैरागी, आशिष गवळी, गोविंद उंबरे, रमेश आकोसकर, दादासाहेब आकोसकर, बाळासाहेब आकोसकर, बाळासाहेब आकोसकर, राम पेंढारकर, चैतन्य ढोबळे, आशिष गवळी, अक्षय वीर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 
Top