भूम (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मंत्री तानाजी सावंत यांना आमदार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आदेश भूम शहर नगरपालिकेचे गटनेते गटनेते संजय गाढवे यांनी बैठक घेऊन जाहीर आवाहन केले आहे. माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी परंडा येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ. तानाजी सावंत यांच्या विकास कामावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या बैठकीसाठी भुम शहरातील सर्व बुथप्रमुख, सर्व शाखाप्रमुख नेते कार्यकर्ते व मतदार हजर होते. यावेळी मार्गदर्शन करताना संजय गाढवे यांनी पालकमंत्री सावंत यांच्या माध्यमातून भूम शहरामध्ये व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आलेला असून आपण पाहतच आहात की भूम शहरांमध्ये तसेच परंडा, वाशी या शहरांमध्ये झालेला विकास पाहता आपणाला पालकमंत्री सावंत यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणायचे आहे. लोकसभेला झालेली पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्व कार्यकर्ते नेते व बूथ प्रमुख आवाहन केले आहे. यावेळी यांनी दक्षता घेण्याचे देखील संजय यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी देखील समजावून घेऊन भविष्यात येणाऱ्या अडचणी देखील दूर करणार असल्याचे सांगितले. आपण सर्वांनी कोणताही मतभेद न करता एक दिलाने तानाजी सावंत यांना पुन्हा एकदा आमदार करण्याचे ठरवले आहे. पालकमंत्री सावंत यांनी भूम शहराचा विकास करत असताना कसलाही मतभेद न करता मोठ्या प्रमाणात विकास निधी देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलला आहे. हे आपणांसमोर दिसतच आहे हे कोणी नाकारू शकत नाही.