धाराशिव (प्रतिनिधी)- यंदाच्या हंगामात सोयाबीनला प्रति क्विंटल पाच हजार रूपयांपेक्षा अधिकचा भाव मिळावा यासाठी आपले आग्रही प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याबाबत सकारात्मक चर्चाही झाली आहे. राज्य सरकार सोयाबीनच्या भावाबाबत गंभीर असून केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

तुळजापूर तालुक्यातील कुंभारी येथे शेतकरी आणि ग्रामस्थांशी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संवाद साधला. सोयाबीनच्या कमी दरा बाबत सरकारने दिलगिरी व्यक्त केली असून अनुदानाच्या माध्यमातून काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याची कृती चालू आहे. येणाऱ्या हंगामात केंद्र सरकारच्या धोरणाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यासाठी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस केंद्रीय मंत्र्यांशी बोलले असून सोयाबीनचा दर प्रती क्विंटल रु. 5000 पेक्षा जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे आ. पाटील यांनी सांगितले.

कृष्णा खोर्यातील हक्काच्या पाण्याबरोबरच उद्योग आणि रोजगार वाढीसाठीही आपले सातत्याने नियोजन बद्ध काम सुरू आहे. तामलवाडी येथे 370 एकरावर एमआयडीसीने भूसंपादनाचे काम सुरू केले आहे. साधारणपणे 10,000 पेक्षा अधिक तरूणांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी तामलवाडी एमआयडीसीत उद्योग सुरू करण्यासाठी उत्स्फूर्तपणे संमतीही दर्शविली आहे.

यावेळी आबासाहेब सरडे, प्रतापसिंह सरडे, बालाजी वडणे, शहाबाज पटेल, नाना पठाडे, अण्णा वडने, आमिरोदिन पटेल,  चंद्रकांत तांबे, राहुल साठे, सयाजी शिंदे, मच्छिंद्र तांबे,  सुदर्शन पठाडे, गोविंद तांबे, मोहसीन शेख,  महादेव कोळी, राजा तांबे यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top