भूम (प्रतिनिधी)- मराठा क्रांतीसुर्य  मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ शनिवारी, (दि 21) भूम शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला असून या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. भूम शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने 11 वाजता सर्वपक्षीय मराठा नेत्यांचा जाहीर निषेध यात्रा काढण्यात आली. यात्रा ची सुरुवात गोलाई चौक ते ओमकार चौक पासून नागोबा चौक, गांधी चौक, वीर गल्ली, ते फुलोरा चौक ते गोलाई यात्रा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करीत बंदचे आवाहन केले. दरम्यान भूम आगारातून बससेवा सुरळीत सुरू असली तरी प्रवशांची संख्या तुरळकच आहे.

तसेच सकाळ पासून काही शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दि. 16 सप्टेंबर 2024 पासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आज उपोषणाचा 6 वा दिवस आहे. मागील कित्येक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राजकीय आकस आणि चालढकल यामुळे आहे. मागील एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून मा. मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाज एकवटला असून लोकशाही मार्गाने मनोज दादा हे उपोषण करत आहेत. त्यांनी वारंवार सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर आपले उपोषण थांबविले परंतु सरकारने आजतागायत समाज आणि समाजाचे आराध्य असलेले दादा यांची दखल घेतली नाही. त्यामुळे मराठा योद्धा जरांगे पाटील पुन्हा उपोषणास बसले आहेत. त्यांची प्रकृती यापूर्वीच्या आंदोलनामुळे आधीच नाजूक असल्याने हे उपोषण त्यांच्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे सरकार म्हणून आपण लक्ष देताना दिसत नाही. आपल्या या कृतीचा, मराठा समाजावर आजपर्यंत झालेल्या अन्यायाचा आणि जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज कडकडीत बंद पाळत आहे. समाजाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या जरांगे पाटील यांच्या जीवावर काही बेतले तर यास सर्वस्वी जबाबदार शासन म्हणून आपण असाल आणि याचे परिणाम देखील वेगळे होऊन लोकशाही मार्ग सोडवा लागेल त्याची जबाबदारी देखील आपली आहे. यामुळे समाजाच्या मागण्या मान्य करून जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवावे ही मागणी सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीने शासनाकडे करण्यात आले आहे.

 
Top