धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी माजी आमदार कुणाल चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत कुणाल चौधरी यांनी धाराशिव जिल्ह्यातील चारही विधानसभा जागा या महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा सर्वेच्या आधारे विश्वास व्यक्त केला.
कार्यकर्त्यांनी एकदिलाने कार्यरत राहावे. येणारा काळ हा आपलाच असेल असा संदेश दिला. व्यासपीठावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष धीरज पाटील, विश्वास शिंदे, प्रदेश सरचिटणीस डॉ.जितेंद्र देहाडे, फरीद देशमुख, राजाभाऊ शेरखाने, सय्यद खलील, प्रशांत पाटील, डॉ.स्मिता शहापुरकर, मेहबूब पाशा पटेल, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, सुभाष राजोळे, विजयकुमार सोनवणे, विलास शाळू, उमेश राजे निंबाळकर, ज्योती सपाटे, आयुब पठाण, सिद्धार्थ बनसोडे, धनंजय राऊत, मुकुंद डोंगरे, प्रकाश चव्हाण उपस्थित होते.
यावेळी तुळजापूर आणि उमरगा या दोन्ही जागा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढाव्यात व निष्ठावंत कार्यकर्त्यांस संधी द्यावी. असा ठराव जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी मांडला. यास सर्व उपस्थितांनी एकमताने अनुमोदन दिले. यावेळी माजी अध्यक्ष विश्वास शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन राजाभाऊ शेरखाने यांनी केले. तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.
बैठकीला उस्मान कुरेशी, अशोक बनसोडे, जावेद काझी, सुरेंद्र पाटील, विजयकुमार वाघमारे, अनंत घोगरे, प्रभाकर लोंढे, कफिल सय्यद, मानवाधिकार अभिमान पेठे, अमोल कुतवळ, अनिलकुमार लबडे, तनुजा हेड्डा, सुवर्णा ढवळे, अभिषेक बागल, शहाजी मुंडे, सुनील बडूरकर, मिलिंद गोवर्धन, विजय मुद्दे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.