धाराशिव (प्रतिनिधी)-  मालवन किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुर्णकृती  पुतळा दुर्घटनाग्रस्त  झाल्याची अत्यंत वाईट घटना घडली या बद्दल भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनीही शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन  माफी मागीतली. तरी देखील राजकीय स्वार्थासाठी महाविकास आघाडीचे नेते सातत्याने सर्व शिवप्रेमी मध्ये संभ्रमावस्था व गैरसमज सातत्यांने जाणीव पुर्वक पसरवत आहे. शिल्पकार जयदीप आपटे, बांधकाम सल्लागार चेतन पाटील इत्यादीनी राजकोट येथे छत्रपती शिवाजी महराजांचा पुतळ्याचे बांधकाम करण्याचे कंत्राट घेऊन काम केले.  असा आरोप करून भाजपच्यावतीने महाविकास आघाडीच्या विरोधात रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी निदर्शेने केली.

महाविकास आघाडीचे थोर नेते मंडळी आदित्य ठाकरे विशाळगडावर अतिक्रमण झाले, तुम्ही गेले होता काय?, संजय राऊत विशाळगडावरील अतिक्रमण काढले, तेव्हा चकार तरी बोललात काय?, उद्धव ठाकरे प्रतापगडावरील अतिक्रमण काढले, तेव्हा केवळ मतांसाठी गप्प राहिलात, अमोल कोल्हे शिवरायांच्या किल्ल्यावर प्रणयदृश्य चित्रीत केले, तेव्हा लाज वाटली नाही का?, शरद पवार शिवरायांच्या मावळ्यांवर मावळमध्ये गोळीबार केला, तेव्हा आदेश कुणाचे?, शरद पवार रायगडावर जाताना ही पायरी मी 40 वर्षांनी चढतोय, हे हसत हसत सांगताना काहीच वाटले नाही?, नाना पटोले ‌‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया'त छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख डाकू म्हणून करणाऱ्या नेहरुंचा वारसा सांगताना लाज नाही वाटत?, विजय वडेट्टीवार मराठी माणसाचे रक्त सांडल्यावर विरोध होऊ नये. हीच का तुमची शिव भक्ती ? असा प्रश्न भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी विचारला आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, शहराध्यक्ष अभय इंगळे, अमोल राजेनिंबाळकर, रोहित देशमुख, गणेश ऐडके, नानासाहेब पाटील, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, गणेश शेळके, शंकर मोरे, व्यंकटेश कोळी, सुनील पंगुडवाले, ओमकार देवकते, सुरज मगर आदी कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थीत होते.

 
Top