धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 'बैलपोळा ' या दिनाचे औचित्य साधून इयत्ता सहावी विभागाने माती पासून बैलांची प्रतिकृती तयार करण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये इयत्ता सहावीच्या वर्गातून तब्बल 150 मुला -मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . या सर्व विद्यार्थ्यांनी मातीपासून अत्यंत आकर्षक , रेखीव अशा बैल जोडी तयार केल्या. या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये शेतकऱ्याचा मित्र असलेला बैलाचे स्थान ट्रॅक्टरने घेतले आहे ; परंतु हा सण आजही महाराष्ट्रात उत्साहात व आनंदात साजरा केला जातो . कालबाह्य होत चाललेल्या या आठवणींना या निमित्ताने स्पर्धेतून उजाळा मिळाला . तयार केलेल्या मातीपासून या प्रतिकृती पाहून प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे उपमुख्याध्यापक प्रमोद कदम , सहावी पर्यवेक्षक निखीलकुमार गोरे यांनी व मान्यवरांनी सर्व मुला - मुलींचे कौतुक केले.ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी श्रीमती एस. एम.शिंदे , श्रीमती व्ही.एल.पवार, श्रीमती देवकन्या कांबळे, श्रीमती मोरे, श्रीमती एम.पी. ठाकूर तसेच विश्वास शेवाळे, हरि मंडोळे आणि सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.