धाराशिव (प्रतिनिधी)- जागतिक स्तरावर नावारूपास आणलेली उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबाद आहे. धाराशिव जिल्ह्याच्याच विकासात नाही तर जिल्ह्याबाहेबर लातूर, सोलापूर, बीड, अहमदनगर जिल्ह्यात आणि कर्नाटक राज्यातील बीदर जिल्ह्यात जेथे बँकींगचा अभाव होता अशा एकूण 30 ठिकाणी बँकेख शाखा विस्तार करण्याचे काम चेअरमन वसंतराव नागदे यांनी केले आणि आज रोजी जवळपास 20 लाख पेक्षा जास्त लोकांना आर्थिक प्रवाहात आणण्यात यश संपादन केलेले आहे. ग्राहकांना सेवा देण्यात आपली बँक/संस्था अव्वल दर्जाची असावी. सामान्य माणसाला मुक्ती मिळावी, धाराशिव शहर व परिसरातील नागरिकांचा आर्थिक विकास व्हावा, गरजुंना किफायतशीरपणे कर्ज उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने दिनांक 30 सप्टेंबर 1933 साली हैद्राबाद को-ऑप, ॲक्ट नुसार अजुमन इम्दादे बहामी या नावाने प्रथम सहकारी संस्था स्थापन करण्यात आली. ही सरकारी संस्था स्थापन करण्यामध्ये प्रामुख्याने कै. फुलचंद रामचंद्र गांधी, कै. शंकर सोनाजी कुलकर्णी, कै. विमलचंद माणिकचंद गांधी, पै. ॲड. ईक्रमुल्ला साहेब, पै. ॲड. जयनुल आबदीन, कै. ॲड. सदाशिवराव पा. देशपांडे, कै. लिबाजीराव गंगाराम कुपाड हे अग्रभागी होते. त्यानंतर कै. बाबुराव दौलतराव कोकाटे, कै. ॲड. मल्लिकार्जुनप्पा शी. तोडकरी, कै. शेषेराव शंकरराव कठारे, कै. केशव तुकराम पाटील, कै. दशरथ धोंडिबा देवकते, कै. व्यंकटेश अंबादास हंबीरे, भाऊसाहेब श्रीपतराव उंबरे, कै. व्यंकटराव लक्ष्मणराव गरड, कै. संभाजी विश्वनाथ जाधव आणि विश्वास जगदेवराव शिंदे यांचे कार्यकाळात बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून वसंत नागदे यांनी कामकाज केले. आणि कै. बी. एस. मोदाणी यांचे कार्यकाळात त्यांना खंबीरपणे साथ दिलेली आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँक लि. उस्मानाबादच्या माध्यमातून गेल्या 91 वर्षापासून आर्थिक क्षेत्रात काम करीत आहे. बँकींग सेवा देण्याची परंपरा अखंडीतपणे चालू ठेवलेली एक खूप मोठी संस्था आहे. 

वसंत नागदे यांनी 1 जानेवारी 1970 रोजी मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बँकेच्या सेवेत रूजू झाले. सरव्यवस्थापक कै. बी. एस. मोदणी यांनी 25 जानेवारी 1971 पासून कामकाज पाहण्यास सुरूवात केली व या दोघांना तत्कालीन संचालक मंडळाने साथ दिल्याने बाज बँकेने गरूड भरारी घेतलेली आहे. तसेच बँकेचे अध्यक्ष वसंत नागदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी कर्मचाऱ्यांचे मनोबल यापुढे ही असेच वृध्दिगंत रहावे म्हणून बँकेच्यावतीने मागील वर्षाप्रमाणे सर्व संचालक व कर्मचारी यांच्यासाठी स्नेह मेळावा व बँकेतील सर्व स्तरावर उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी यांच्या करिता प्रोत्साहनपर बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. 

आठव्या ऑल इंडिया अर्बन को-ऑप. बँकींग सर्वोच्च परिषद 2024 पुणे येथील वेस्टिन हॉटेल, कोरेगाव पार्क येथे दिनांक 8 मार्च 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत मराठवाड्यातील सर्वात मोठ्या अग्रगन्य आणि जुनी बहुराज्यीय बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात कार्यक्षेत असणाऱ्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सहकार महर्षी वसंतराव नागदे यांना सन 2024 सालचा सहकार व बँकींग क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट चेअरमन सर्वोच्च पुरस्कार समारंभ पुर्वक पुणे येथे प्रदान करण्यात आला. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोडके, बँकेचे संचालक आशिष मोदानी, प्रदीप जाधव पाटील हेही उपस्थित होते. 

 
Top