कळंब (प्रतिनिधी)-शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथे राष्ट्रीय सेवा योजना ,ग्रीन क्लब आणि वनस्पती शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छता ही सेवा अभियान 2024' ला सुरुवात झाली. येत्या 2 ऑक्टोबरपर्यंत हे अभियान सुरू असेल. स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता ही यंदाच्या अभियानाची संकल्पना आहे. यंदाच्या अभियानासाठी संपूर्ण समाजाचा सहभाग असावा या दृष्टीने श्रमदान मोहिमा, जन भागिदारी आणि सफाई मित्र हे तीन प्रमुख स्तंभ म्हणून निश्चित केले गेले आहेत. या अभियाना अंतर्गत पर्यटनस्थळं, सार्वजनिक इमारती, व्यापारी क्षेत्र, पाणवठे, प्राणिसंग्रहालयं सामुदायिक आणि सार्वजनिक स्वच्छतागृह अशा विविध ठिकाणी स्वच्छताविषयक श्रमदान आणि सामूहिक मोहिमा राबवल्या जाणार आहेत. दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांनि मांजरा नदी काठ च परीसर स्वच्छ केला. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.राघवेंद्र ताटीपामुल,डॉ. पल्लवी उंदरे, डॉ. संदीप महाजन यांनी स्वछतेचे महत्व सांगितले. यावेळी वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख प्रा.अर्चना मुखेडकर यांनी दूषित पाण्यामार्फत होणारे रोग आणि प्रतिबंधक उपाय याविषयी माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनि याविषयी विविध पोस्टर बनवून जनजागृती केली.
तसेच ग्रीन क्लब समन्वयक डॉ. विश्वजीत म्हस्के यांनी जलसंवर्धन आणि जलप्रदूषण याविषयी जन जागृती केली. अभियानाच्या निमित्तानं आज स्वच्छताविषयक शपथ ग्रहण कार्यक्रमांचं आयोजन केले गेले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त 17 सप्टेंबर 2024 ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा - 2024 मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता यांचे पालन करणे व 2 ऑक्टोबर गांधी जयंतीला “स्वच्छ 2 ऑक्टोबर” म्हणून साजरा करणे आहे.असे प्रतिपादन केले,याप्रसंगी डॉ. दत्ता साकोळे, प्रा.नितीन अंकुशराव आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशवीरित्या पार पाडण्यासाठी अर्जुन वाघमारे, अधीक्षक हनुमंत जाधव, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे यांनी परिश्रम घेतले.