धाराशिव (प्रतिनिधी)- 08 मोटरसायकल व 01 छोटा हत्ती वाहन चोरी करणारा अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मोटार सायकलचे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढून चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत पथक मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम सिद्राम पोपट पवार, वय 24 वर्षे, रा. वरुडा पारधी पिढी ता. जि. धाराशिव याने धाराशिव जिल्ह्यातील व परजिल्ह्यातील बऱ्याच मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत. त्या मोटारसायकली या त्याचे घराचे बाजूला लावलेल्या आहेत. तो सध्या वरुडा पारधी पिढी येथील त्याचे घरी आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथक ठिकाणी रवाना हावूेन इसमास ताब्यात घेवून त्याच्या ताब्यातुन एकुण 08 मोटारसायकली व 01 छोटा हत्ती वाहन असा एकुण 4 लाख 35 हजार किंमतीचा माल जप्त केला. तसेच आरोपीस अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे नमुद गाड्या व छोटा हत्ती बाबत चौकशी केली असता सदरच्या मोटार सायकली व छोटा हत्ती वाहन पांगरधरवाडी, कोंड, तुगाव, जि. धाराशिव, बार्शी, पांगरी, भोगाव जि. सोलापूर ग्रामीण व कवठेमहाकाळ जि. सांगली व शिक्रापुर जि. पुणे येथुन चोरुन आणल्याचे सांगीतले.
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली सथानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार विनोद जानराव, अमोल निंबाळकर, समाधान वाघमारे, महिला पोलीस हावलदार शोभा बांगर, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस अंमलदार रंजना होळकर, चालक पोलीस हावलदार महेबुब अरब, चालक पोलीस अंमलदार प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली आहे.