धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यात आगामी काळात महत्वाचे सण-उत्सव साजरे होणार असुन श्री गणेश उत्सव, नवरात्र उत्सव तसेच विधानसभा निवडणुक होणार असल्याने  विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांची आढावा बैठकीचे आयोजन करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीस विरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र छत्रपती संभाजीनगर, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

सदर बैठकीमध्ये आगामी गणेश उत्सव, ईद, निवडणुकच्या अनुषंगाने ध्वनी प्रदुषणा बाबत सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. विसर्जन मिरवणुका या मुक्त करण्यात याव्यात. तसेच गणेश मंडाळाच्या ठिकाणी समाजप्रबोधन देखावे लावावेत. तसेच सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जातीय सलोखा टिकून राहण्यासाठी सण उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी मार्गदर्शक सुचना देण्यात आल्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे मिरवणुक मार्ग, विसर्जन ठिकाणी चोख बंदोबस्त  ठेवतील. दाखल सर्व गुन्ह्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाच्या कामाचे मिश्र यांनी कौतुक केले. 


 
Top