तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील सारा गौरव वसाहतीत श्रीगणेश उत्सवा निमित्ताने श्री तुळजाभवानी नेत्रालय वतीने घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबिरात 80 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
या शिबिराला रोटरी अध्यक्ष प्रशांत अपराध, प्रा शिवाजी सुयश जाधव प्रा शिवाजी जेटीथोर अदि मान्यवरांनी भेट देवुन या उपक्रमाचे कौतुक केले.
या शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. गितांजली कुंडलिक माने यांनी रुग्णांची तपासणी केली. त्यांना डॉ. सुयश जाधव, जयश्री पवार, अमर टोंपे आदींनी सहकार्य केले. यावेळी डॉ. माने यांनी कॉम्प्युटराईज नेत्र तपासणी, ऑपरेशन, काचबिंदू, शस्त्रक्रिया लेन्सवरील जाळी काढणे, रेटिना, डोळ्यातील वाढलेले मांस काढणे, मोतीबिंदू शस्त्रकिया, बिना टाक्याचे मोतीबिंदू ऑपरेशन, तिरळेपणा शस्त्रक्रिया, लहान मुलांचे नेत्ररोग उपचार, ए-स्कॅन सोनोग्राफी, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रीया याबाबत मार्गदर्शन केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सारा गौरव सोसायटी गणेश मंडळ पदाधिकारी व श्री तुळजाभवानी नेत्रालयच्या नेत्ररोग तज्ञ डॉ. गीताजंली माने व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.