भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील जयवंतनगर येथे प्रल्हाद नागरगोजे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागरगोजे कुटुंबीय सतत सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर राहिले आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा असणारा तुटवडा लक्षात घेत त्यांनी अवाजवी खर्चाला फाटा देत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 63 बहाद्दरांनी रक्तदान केले. 

या रक्तदान शिबिराचे आयोजन भगवंत ब्लड बँक बार्शी व नागरगोजे कुटुंबियांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उदघाटन युवा उदयजक शंकर नागरगोजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा पं सदस्य विनोद नागरगोजे, सुभेदार कानिफनाथ मोराळे, ऍड भगवान नागरगोजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नामदेव नागरगोजे, चेअरमन श्रीमती सुरेख नागरगोजे,सोसायटीचे संचालक नवनाथ नागरगोजे, सोपान नागरगोजे, आशाबाई, सदाशिव नागरगोजे, ज्ञानोबा कानडे, भुजंग नागरगोजे, बाजीराव नागरगोजे, महादेव मोराळे, प्रकाश नागरगोजे, विक्रम नागरगोजे, लक्ष्मण नागरगोजे,भीमराव नागरगोजे, ओळ नागरगोजे, अमोल नागरगोजे, दत्तात्रय नागरगोजे यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.


 
Top