धाराशिव (प्रतिनिधी)- नुकत्याच झालेल्या शिक्षक दिन, गणेशोत्सव अशा विविध सण,कार्यक्रमाची धामधूम चालू असताना त्या धर्तीवर येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध विभागांनी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

  येथील मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागाच्या “मेसा “( मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन )च्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याचाच एक भाग म्हणून येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्रांमध्ये जमीन आणि पाणी व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ.विक्रमसिंह माने, अकॅडमिक डीन आणि  मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख  डॉ डी.डी.दाते, डॉ.उषा वडणे,प्रा एस जि शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. नितीन पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे वेगळा उपक्रम ठेवल्याबद्दल प्रथम मी त्यांचे कौतुक, अभिनंदन करतो. कारण व्याख्यानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांची मार्गदर्शन ऐकण्याची तयारी असते ते विद्यार्थी नक्की यशस्वी होतात. पुढे बोलताना ते म्हणाले की, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की इंधनाचे नैसर्गिक स्त्रोत हे आज ना उद्या संपणार आहेत.  पाणी, पेट्रोल असो की ऊर्जा. हे सर्व संपणारे घटक असून नवीन तंत्रज्ञान विकसित होत असून रिनीवेबल एनर्जी सारख्या विषयात विद्यार्थ्यांनी संशोधन केले पाहिजे. याच विषयाच्या अनुषगाणे आणखीन काय करता येईल हे पहिले पाहिजे.

यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की , मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या अनेक चांगल्या संधी  उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी आपल्या डिग्री बरोबरच कौशल्यावर आधारित ट्रेनिंग ,क्लासेस करणे मात्र अनिवार्य असून त्या दृष्टीने महाविद्यालय सातत्यपूर्ण प्रयत्नशील असते. म्हणूनच आमचा प्लेसमेंट चा आकडा हा खूप मोठा असून तो ठळक दृष्टिक्षेपात येणारा आहे. विभाग प्रमुख डॉ डी डी दाते यांनी यावेळी सध्या विद्यार्थ्यांच्या समोर असलेली आवाहन व त्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कसे तयार व्हावे ,तांत्रिक दृष्ट्या सुसज्ज व्हावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

 तसेच यापूर्वीच्या विद्यार्थ्यांचा यशस्वी आलेख हि त्यांनी विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. यावेळी डॉ. उषा वडणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु ज्ञानेश्वरी करपे आणि मोटे या विद्यार्थ्यांनी  केले.

 
Top