मुरूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत दरवर्षी चित्रकला परीक्षा आयोजित करण्यात येतात. शासकीय रेखा कला परीक्षा 2024 (सप्टेंबर) मध्ये ता. 25 व 26 रोजी एलिमेंट्री परीक्षा ता. 27 व 28 रोजी इंटरमिजिएट परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे केंद्र जिल्हा परिषद कन्या प्रशाला होते. मुरूम परिसरातील बारा शाळांनी या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेला आहे. 

यामध्ये कन्या प्रशाला, जिल्हा परिषद मुलांची प्रशाला, ज्ञानदान विद्यालय, प्रतिभा निकेतन विद्यालय, शासकीय निवासी आश्रम शाळा, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, व्ही. जे. आश्रम शाळा (नाईकनगर), ज्ञानदीप विद्यालय (दाळींब), डॉ. झाकीर हुसेन उर्दू हायस्कूल, लालबहादूर शास्त्री विद्यालय (बेळंब), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (बेरडवाडी) तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी सदर परीक्षेसाठी प्रविष्ट झाले आहेत. सदर परीक्षेत मिळणाऱ्या ग्रेडनुसार दहावी बोर्ड परीक्षेत अतिरिक्त गुण दिले जातात. गुणांची विभागणी ग्रेडनुसार करण्यात आली आहे. अ ग्रेड साठी सात गुण, ब ग्रेड साठी पाच गुण व क ग्रेड साठी तीन गुण.  तसेच या रेखाकला परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय पॉलिटेक्निक व इंजिनिअरिंग प्रवेशावेळी प्राधान्यक्रम दिले जाते. अशी माहिती कला अध्यापक संघ, धाराशिवचे सदस्य रुपचंद ख्याडे यांनी सांगितले. परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक मंकावती कांबळे यांनी एलिमेंटरी परीक्षा साठी 189 विद्यार्थी व इंटरमिजिएट परीक्षा साठी  169 विद्यार्थी प्रविष्ट झाल्याचे सांगितले. 

समन्वयक महादेव कुनाळे, हरी शेके, बालाजी गायकवाड, डॉ. वंदना जाधव, सोनाली कलशेट्टी, बिना पोतदार, सविता साळुंखे, कलाशिक्षक सुनिल राठोड, परशुराम कळपे, बाळू लोहार, शहाजान पटेल, स्वप्नील पाटील, संतोष कडगंचे, हेमंत अकुसकर, पंकज पाताळे, विश्वनाथ जोशी, तात्या जाधव, ललिता पवार आदींनी परीक्षेचे नियोजन व व्यवस्थापन केले.                  


 
Top