धाराशिव (प्रतिनिधी)-आमदार राणाजगजितसिंह यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 200 अर्ज परिपूर्ण भरून दाखल कऱण्यात आले यामुळे फॉर्म भरलेल्या वृद्धांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य खरेदी करण्यासाठी 3000 रुपयांचा लाभ मिळणार आहे.महाराष्ट्रातील महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे त्याचा फायदा अनेक सर्वसामान्य नागरिकांना होताना दिसतो आहे.शासनाच्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब सातत्याने प्रयत्न करतात.मागील काही दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते.

टाकळी (ढोकी) ता. धाराशिव व जिल्हा परिषद गट कोंड परिसरातील गावे येथील 65 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांचे 200 पेक्षा जास्त अर्ज परिपूर्ण भरण्यात आले. ते गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर जमा करण्यात आले. हे संपूर्ण अर्ज आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सूचनेवरून व भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर भारतचे जिल्हा संयोजक तथा भाजपा अ.जा.मोर्चा प्रदेश चिटणीस सचिन लोंढे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या पुढाकारातून भरण्यात आले. 

यावेळी अर्ज जमा करताना भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर,प्रदेश चिटणीस, अ.जा.मोर्चा सचिन लोंढे, ओंकार देवकते, सुरज लोंढे,आमिर सौदागर, ऋषी मगर,सुरज मगर,ज्ञानेश्वर डीगे,लखन बटनपुरे, विकास पाटील,विकास दूधभाते, वसंत ठोंबरे उपस्थित होते.

 
Top