तेर (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालाय येथे नेत्र दान पंधरवडा निमित्त शिबीर घेण्यात आले.
नेत्र दान या संदर्भात नेत्र चिकित्सा अधिकारी आयुब शेख यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी नेत्र दान ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. घोंगडे यांनी यावेळी सांगितले. यावेळी नेत्र दानाचे संमती पत्र भरून घेण्यात आले. यावेळी 11 नागरिकांनी नेत्र दानाचा संकल्प केला. या शिबिरामध्ये 10 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे पाठविण्यात आले.