तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दि 5 सप्टेंबर रोजी भारतरत्न पुरस्कार प्राप्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन औचित्य साधुन विध्यार्थांनी शिक्षक भूमिका बजावुन काही तास शिकवून शिक्षण  दिन साजरा केला.

प्रथम प्राचार्य श्री के वाय इंगळे सर व प्राचार्याची भूमिका निभावणारे कु. सरस्वती घंटे व मा.अभिजीत भोसले यांच्या द्वारा प्रतिमेचे पूजन करून करण्यात  आले.

यावेळी  उप प्राचार्याची भूमिका निभावणारे सार्थक शिंदे व अरहंता वाघमारे, एच जी जाधव ,श्री एस डी खोब्रागडे, श्री बसवराज कोरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कु. वेदिका गाडेकर व सत्यजित घाडगे या विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हाडाचे शिक्षक कसे होते यावरती आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा गुलाब व लेखणी देऊन  सन्मानित केले. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी सहावी ते अकरावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी ,इंग्रजी, सामाजिक विज्ञान, विज्ञान, गणित, संगीत, चित्रकला, योगा यांचे तास घेतले त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांना किती परिश्रम घेऊन अध्यापन करावे लागते याचे अनुभव कथन केले. शिक्षकांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य चौगुले व अवंतिका मोहिते या विद्यार्थ्यांनी केले ,तर आभार प्रदर्शन नम्रता होनमाने या विद्यार्थिनीने केले.


 
Top