परंडा (प्रतिनिधी) - श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.रा गे शिंदे गुरुजी यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त गुरुवार दि.5 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शंभराव्या जयंतीनिमित्त 100 बँक रक्तदान करण्यात आले. तर शंभर फटाके  वाजवून गुरुजींना अभिवादन करण्यात आले.

प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. श्रीमान रामभाई शहा रक्तपेढी बार्शी व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुधीर सुमंत व त्यांची संपूर्ण टीम या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होते .तर रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील रक्तदान शिबिराचे चेअरमन डॉ. अमर गोरे पाटील, डॉ. कृष्णा परभणे, डॉ. सचिन चव्हाण  यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अनमोल असे सहकार्य केले. महाविद्यालयात दिनांक 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर रोजी जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 6 सप्टेंबर रोजी कृषिरत्न बीबी ठोंबरे यांच्या उपस्थितीमध्ये भव्य राज्यस्तरीय शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सुनील जाधव यांनी केले आहे. प्राध्यापक डॉ. अमर गोरे पाटील यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. सचिन चव्हाण यांनी सूत्रसंचालन केल.  तर शेवटी कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी मानले.

 
Top