धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीच्या वतीने एसटी परिवहन महामंडळ धाराशिव येथे निषेध आंदोलन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षापासून त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीची बैठक वीस तारखेला होणार होती पण ती बैठक अद्याप पर्यंत झालेली नाही. ही बैठक वेळेत न लागल्यामुळे महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीच्या वतीने निदर्शने आंदोलने करण्यात आले आहे. तरीही बैठक लवकरात लवकर लावावी व प्रलंबित मागण्या लवकर पूर्ण व्हाव्या प्रलंबित मागण्या न पूर्ण झाल्यास येणाऱ्या 3 सप्टेंबर पासून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त समितीच्या वतीने 3 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात पूर्णपणे एसटी बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलक राजेश काशीद यांनी दिला आहे.
यावेळी तात्यासाहेब रणखांब, बालाजी पाटील, सुदर्शन जाधव, सतीश धस,आप्पासाहेब दणके,दादासाहेब बनसोडे, राहुल वाघमारे, बालाजी कापसे, ओंकार कालेकर, कुलदीप सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.