तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील काटगाव,  येथील राजेंद्र प्रकाश महाजन यांची मुरा जातीची एक लाख रुपये किमतीची म्हैस शनिवारी रात्री शेतातून दहा ते दोनच्या दरम्यान चोरीस गेली होती. सदरील म्हैस रविवारी सांगोला येथील बाजार असल्याची माहीती नातेवाईकाकडुन कळताच महाजन यांनी तिथे जावुन म्हैस ताब्यात घेतली.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि,  काटगाव,  येथील राजेंद्र प्रकाश महाजन यांची मुरा जातीची  एक लाख रुपये किमतीची म्हैस  शनिवारी रात्री शेतातून दहा ते दोनच्या दरम्यान चोरीस गेली होती. सदरील म्हैस रविवारी सांगोला येथील बाजार असल्याची माहीती नातेवाईकाकडुन मिळताच त्यांनी  तेथे असणारे नातेवाईकांना महाजन यांनी फोटो पाठवले. त्या बाजारात पाहुणे मंडळींनी बाजारात म्हैस बघून गावाकडे फोन केले असता गावातील सर्व महाजन कंपनी व गावकरी बाजारात येऊन प्रत्यक्ष पाहणी करून म्हैस ओळखले. त्यावेळेस गावातील युवक सदरील म्हैस वाहनातुन येथे घेवुन आला. त्यांनी बाजारात म्हैस चाळीस हजार रुपये किमतीने विकत देऊन एक हजार रुपये विसारा पण घेतला होता. राहिलेले निमी पैसे आता द्या आणि पुढच्या रविवारी मी पुन्हा एक म्हैस घेऊन येतो त्यावेळेस निम्मी पैसे द्या असे म्हणून तेथून पळ काढण्याच्या मार्गावर होता. तेवढ्यात गावातील मंडळी व म्हैस मालक ईटकळ पोलिसांना घेऊन बाजारात पोचले. त्यानंतर त्याच्याकडे चौकशी करत असता त्याने गावातील एकाने मला  म्हैस आणून दिले आहे असे सांगितले. काटगाव येथे म्हैस, पाणबुडी मोटारी चोरींच्या प्रकरणात मोठी वाढ झाली असुन या चोऱ्या मागे मोठी टोळी असल्याचा संशय असल्याने  त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांची टोळी पकडून यांचा बंदोबस्त करावा व यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे. अन्यथा आंदोलन करावे लागेल अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गातुन येत आहेत.

 
Top