तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर-आरळी ब्रुद्रुक मार्ग अणदूर जाणारी बस सुस्थितीतील व नियमित व वेळेवर सोडण्याची मागणी स्वराज्य संघटनेने आगार प्रमुख तुळजापूर यांना निवेदन देवुन केली.

 निवेदनात म्हटलं आहे कि, तुळजापूर आगाराची तुळजापूर-आरळी बु. मार्गे अणदूर जाणारी (सकाळ व सायंकाळ) बस नियमित व वेळेवर येत नसल्यामुळे विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कधी कधी या गाड्या रस्त्यामध्येच बंद पडतात व त्यामुळे विद्यार्थी (मुली) यांची सुरक्षितता लक्षात घेता आपण गांभीर्याने विचार करून बस सुस्थितीतील व चांगल्या प्रकारची बस सोडून विद्यार्थ्यांची व प्रवाशांची हेळसांड होऊ नये याची काळजी घेण्यात यावी. अन्यथा स्वराज्य पक्ष राज्य मार्ग परिवहन महामंडळा विरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी आगारप्रमुख म्हणून

आपली असेल, असा इशारा वजा निवेदन स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

 
Top