धाराशिव (प्रतिनिधी)- हर घर तिरंगा याप्रमाणे हर घर भारतीय संविधान अभियान राबविण्यात येऊन भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधान जनजागृती करण्यात यावी. अशा प्रकारची मागणी मतदार जनजागरण समितीच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्या कडे करण्यात आली.
निवेदनात म्हटले की, दि.15 ऑगष्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने हर घर तिरंगा दि.13 ऑगष्ट ते दि.15 ऑगष्ट 2024 कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे. सध्या भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष चालू असून भारतीय संविधानाचा जागर व्हावा यासाठी हर घर तिरंगा याप्रमाणे हर घर संविधान असे अभियान राबविण्यात आले पाहिजे. भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक भारतीयांना झाली पाहिजे. भारतीय संविधान दिनाला दि. 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75 वर्षे पूर्ण होतात. तर दि. 26 जानेवारी 2025 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाला 75 वर्षे पुर्ण होता. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण देशभर साजरा केला असुन भारतीय प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव याचप्रमाणे,भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव हा मोठ्या प्रमाणावर या देशात साजरा झाला पाहिजे. दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा ध्वजारोहण होत असताना यावेळी भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन झाले पाहिजे. हर घर तिरंगा या अभियानाप्रमाणे भारतीय संविधानाचा सध्या अमृत महोत्सव वर्ष चालू असून संविधानाचाही गौरव झाला पाहिजे. यासाठी हर घर तिरंगा या अभियानाप्रमाणेच हर घर भारतीय संविधान हे अभियान राबविण्यात आले पाहिजे. अशा प्रकारचे लेखी निवेदन मतदार जनजागरण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. निवेदनावर गणेश रानबा वाघमारे, धनंजय वाघमारे, संपतराव शिंदे,बापु कुचेकर, रोहिदास झेंडे, घाडगे एम. आर., भाऊसाहेब झेंडे यांच्या सह्या आहेत.