भूम (प्रतिनिधी)-  भारतीय जनता पार्टीचे जिल्हास्तरीय अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात पक्षाचे लोकसभा निवडणूकीतील कसर भरून काढण्याचे ठरणार आहे. या अधिवेशनास कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाचे विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.

सोमवार दि. 12 ऑगस्ट 2024 रोजी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे एक दिवशीय अधिवेशन आयोजित केलेले आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी मंत्री बसवराज पाटील, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य पाटील उपस्थित राहणार आहे.

या एक दिवशीय अधिवेशनासाठी धाराशिव जिल्ह्यातील भाजपाचे आजी माजी पदाधिकारी, विद्यमान पदाधिकरी, आमदार, माजी आमदार, लोकसभा व विधानसभा निवडणूक लढलेले उमेदवार, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कार्यकारीणी सदस्य, आघाड्या, प्रकोष्ट, मोर्चे जिल्हा, तालुकाध्यक्ष, महामंत्री, तालुका पदाधिकारी,  नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक, सरपंच, चेअरमन, सहकारी बँकेचे संचालक, शिक्षण संस्था संचालक यां सर्वांनी अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन भूम - परंडा - वाशी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांनी केले आहे.

 
Top