धाराशिव (प्रतिनिधी)- लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन सामुदायिक बुध्द वंदना घेण्यात आली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याला उजाळा देत त्यांनी लिहिलेल्या कांदबरी,कथा, प्रवास वर्णन त्यांच्या साहित्यातुन परिवर्तन घडविण्याचे कार्य केले,त्यांचे लेखन वास्तववादी व समाजाला दिशा देणारे होते.अभिवादनावेळी अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे, गायकवाड मामा,गणेश रानबा वाघमारे,संजय गजधने, स्वराज जानराव,सोहन बनसोडे, राजाराम बनसोडे, अतुल लष्करे,नाना भेंडे, प्रभाकर सोनवणे,बालाजी माळाळे,बनसोडे अन्य इतर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन धनंजय वाघमारे यांनी केले तर आभार अंकुश उबाळे यांनी मानले.