धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांनी वरील प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की,मराठी साहित्याच्या क्षेत्रात अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वेगळ्या वळणाचे, वेगवेगळ्या ढंगाचे आहे. हे साहित्य मानवी मनाला ओढ लावते. असे ते म्हणाले.
याप्रसंगी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. केशव क्षीरसागर, प्रा. माधव उगिले आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.