तुळजापूर (प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध अनेकांना लागले आहेत. त्यादृष्टीने मतदारसंघात इछुक मंडळी कामाला लागले असुन गावपातळीवर नेते कार्यकत्यांची जुळवाजुळव सुरु केली असली तरी मतदारांना आपल्या कडे खेचण्यासाठी काय करावे यासाठी माहीती संकलन व मंथन सुरु झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवलेली करामत ही प्रस्थापित नेत्यांना ही चिंता करणारी ठरत आहे. विशेष म्हणजे महायुती महाविकास आघाडीचे तालुक्यात लोकसभेनंतर समसमान वातावरण निर्माण झाल्याने महाविकास आघाडीसाठी जागा खेचण्यासाठी पक्षांमध्ये, उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांमध्ये चुरस लागल्याचे दिसुन येत आहे.
या मतदारसंघात सर्वच पक्षांत जुन्या कार्यकत्यांचा मोठा भरणा असताना लोकसभा निवडणुकीनिमित्त अनेक नवीन कार्यकर्ते तयार झाले आहेत. निवडणूक आली की वेगवेगळे उद्देश समोर ठेऊन कार्यकर्त्यांची रेलचेल होते. काही एकनिष्ठ असतात, तर काही उद्देश साध्य करण्याच्या दृष्टीने फिरते असतात.
विधानसभेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. तुळजापूर मतदारसंघाचे विधमान आ राणाजगजितसिंहजीपाटील हे ऐकमेव्य जिल्हयातील भाजप आमदार आहेत. त्यामुळे त्यांना तुळजापूर विधानसभा मतदार संघात तगडा उमेदवार देवुन प्रचारात येथेच अडकुन ठेवण्याचे नियोजन महाविकास आघाडी व मिञ पक्षात चालु असल्याचे समजते आहे. भाजपकडुन विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, लोकमंगल समुहाचे रोहन देशमुख यांच्यात उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस असल्याचे बोलले जाते.
लोकसभा निवडणुकीत विशेषता काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथा झाल्याने काँग्रेस उमेदवारी बाबतीत सध्या संभ्रमस्था निर्माण झाली असुन त्यांच्यात इच्छुकांचा संखेत वाढ झाली आहे. हे आणखी काय कमी म्हणून शिवसेनाउबाठा खा. ओमराजे निंबाळकर यांनी श्रीतुळजाभवानी मातेच्या वास्तव्याने पुनित झालेल्या तुळजापूर विधानसमा मतदार संघावर भगवा फडकावून कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेचे स्वप्न पुर्ण करणार असल्याचे भाषणा दरम्यान सांगितले. तसेच नुकतेच खा. ओमराजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली ही भेट कशासाठी घेतली या बाबतीत ही मतदार संघात चर्चला उधाण आले आहे.
काँग्रेस मधील इछुकांचा वादाचा लाभ शिवसेनाउबाठा घेण्यासाठी सरसावल्याचे बोलले जाते आहे. शिवसेना या जागेवर लोकसभेत शिवसेनाउबाटा उमेदवारा 52हजार मताचे मताधिक्य मिळाले असे सांगण्याची शक्यता आहे. विशेषता महाविकासआघाडी मधुन विधानसभा निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला इच्छुक मोठ्या संखेने लागले आहेत. या निवडणुकीत कोण कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल. याबाबत बराचसा संभ्रम आहे. महाविकास आघाडीकडुन उमेदवारी मिळविण्यासाठी काही मातब्बर इच्छुक प्रयत्नशील आहेत.