तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र सरकारने स्वताचे हिदुंत्व सिध्द करण्यासाठी नळदुर्ग येथे गाईची कत्तल करणाऱ्या नराधमांच्या घरावर बुलडोझर फिरवावे असे आवाहन राज्य सरकारला हिंदू राष्ट्र सेनेचे शहर प्रमुख परिक्षित सांळुके यांनी नळदुर्ग येथे शनिवार दि. 2 ऑेगस्ट रोजी नळदुर्ग मध्ये गोहत्या करून व्हिडिओ प्रसारित केल्यामुळे समस्त हिंदू संघटना यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

गोहत्या करून व्हिडीओ प्रसारित केल्यामुळे भावना दुखावल्या गेल्यामुळे हजारो हिंदुत्ववादी यांनी एकत्र येऊन नळदुर्ग शहरातून फेरी काढून निषेध व्यक्त केला. यावेळी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदुराष्ट्र सेना, हिंदू जनजागृती समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, अखिल भारतीय कृषी गोसेवा संघ या संघटनांनी सदर घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी बोलताना साळुंके पुढे म्हणाले कि, भारत देशात एक देश एक संविधान चालते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथे गाईची कत्तल केल्यास आरोपीचा घरावर बुलडोझर फिरवले जाते. तर तर महाराष्ट्रात योगी पँटर्न कधी राबवणार असा सवाल केला. आम्ही तक्रार करायाची तर लोकप्रतिनिधी कशासाठी निवडुन दिले असा सवाल केला.

यावेळी परीक्षित साळुंके, अंकुश चिंनकरे, अमित कदम, गजानन कुलकर्णी, संजय बताले, सुदर्शन वाघमारे, रोहित बागल, दिनेश धनके, राज गाढवे  सह हिदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भारत देशात एक देश एक संविधान चालते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश येथे गाईची कत्तल केल्यास आरोपीचा घरावर बुलडोझर फिरवले जाते. तर तर महाराष्ट्रात योगी पँटर्न कधी राबवणार असा सवाल यावेळी आंदोलकांनी केला.

 
Top