तुळजापूर (प्रतिनिधी)- डॉ.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीच्या निमित्ताने अपसींगा येथे डॉ.अण्णाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रेणुका ब्लड सेंटर धाराशिव यांच्या उपस्थितीत शिबिर घेण्यात आले. प्रसंगी उपस्थित मंडळाचे पदाधिकारी लहुजी शक्ती सेनेचे विजय सर क्षीरसागर ऍड. सुनील क्षीरसागर , संदेश क्षीरसागर, धीरज कांबळे, प्रवीण क्षीरसागर, इंद्रजीत सुरवसे,शुभम कसबे, बंटी क्षीरसागर महेश कांबळे, विठ्ठल कांबळे,दिनेश कसबे,योगेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.