तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील श्री तुळजाभवानी नेत्रालय व रोटरी कल्ब यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवस घेण्यात आलेल्या शिबीरात शेकडो रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. या शिबीराला सामाजिक कार्यकत्या मीनाताई सोमाजी किरण क्षिरसागर दत्ता अंबर यांनी भेट देवुन उपक्रम बद्दल आभार मानले.
सुप्रसिद्ध नेञरोग तज्ञ डॉ. गितांजली कुंडलिक माने (एमएस) नेत्ररोग तज्ञ यांनी नेञ रुग्णांची तपासणी केली. त्यांना समर्थ मुळे जयश्री पवार, अमर टोंपे, आकाश शिंदे अदींनी सहकार्य केले. यावे कॉम्प्युटराईज नेत्र तपासणी. सुसज्ज ऑपरेशन काचबिंदू शस्त्रक्रिया. याग लेसर (लेन्स वरील जाळी काढणे) रेटिना (दृष्टीपटल) डोळ्यातील वाढलेले मांस काढणे, शस्त्रक्रिया. व्यवसाय जन्य नेत्ररोग विषयी मार्गदर्शन, लासरु मोतीबिंदू शस्त्रकिया, बिना टाक्याचे मोतीबिंदू ऑपरेशन, तिरळेपणा शस्त्रक्रिया, लहान मुलांचे नेत्ररोग उपचार, ए-स्कॅन सोनोग्राफी मशिन, मोतीबिंदू निदान व शस्त्रक्रिया वापर या विषयावर मार्गदर्शन केले. या शिबीर यशस्वीते साठी श्री तुळजाभवानी नेत्रालयच्या नेञरोग तज्ञ डॉ. गीताजंली माने पाटील, रोटरीचे अध्यक्ष प्रशांत अपराध, सचिव संतोष लोखंडे, सह रोटरीयनने परिश्रम घेतले.