तुळजापूर (प्रतिनिधी)- मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ आले असता दलित, मुस्लीम, लिंगायत, मातंग, महिलासह अठरा पगड जातीच्या मंडळीनी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले.
तिर्थक्षेञ तुळजापूर येथे आगमन होताच मुस्लीम बांधवानी फरची टोपी घालुन, बुके देवुन स्वागत केले. तर श्रीतुळजाभवानी दर्शन घेतल्यानंतर दलित बांधवाचे कुलदैवत असलेल्या अदिमाय अदिशक्ती मातंगी देवीचे दर्शन घेताच दलित बांधवांनी मातंगी देवी मंदीरात मातंगीदेवी प्रतिमा देवुन शाल, हार घालुन सत्कार करुन स्वागत केले. तसेच लिंगायत, चर्मकार बांधवांनी व महिला यांनी त्याचे स्वागत केले.