भूम (प्रतिनिधी)- धाराशिव येथील व्यंकटेश महाजन महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय द्वारा आयोजित जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धा सन 2024-2025 पार पडल्या. जिल्हास्तरीय वेट लिफ्टींग स्पर्धेत भूम येथील शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी आखिलेश आसिफ जमादार याने 73 किलो वजन गटात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याची पुढे विभागीय स्तरावर निवड करण्यात आली.
अखिलेश जमादार हा मौलाली तालिम संघाचा खेळाडू असून, त्याला सूर्यवंशी एम.जी.सर यांचे मार्गदर्शन लाभले. मराठवाड्यातही वेटलिफ्टिंग च्या माध्यमातून नाव लौकिक करता येते असे या होतकरू विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे .त्याच्या यशाबद्दल शंकरराव पाटील कॉलेजच्या वतीने प्राचार्य संतोष शिंदे सर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे.वेटलिफ्टिंग स्पर्धा पार पाडण्यासाठी राम भुतेकर यांनी परिश्रम घेतले आहे.