धाराशिव (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा लढा महाराष्ट्रच्या स्वाभिमानाचा या टॅगलाईनखाली धाराशिव जिल्ह्यात मंगळवारी (दि.१३) पासून येत आहे. मंगळवारी परंडा येथे सकाळी ६ वाजता यात्रेचे आगमन होत आहे. त्यानंतर सकाळी ६ ते ८ या वेळेत परंडा येथील राजविरा मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे. या यात्रेत शरदचंद्र पवार प्रेमी नागरिकांसह राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन धाराशिव येथील सोमवारी (दि.१२) झालेल्या आढावा बेठकीत जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केले आहे.
त्यानंतर ही यात्रा रात्री धाराशिव येथे मुक्कामी येत आहे. बुधवारी (दि.१४) तुळजापूर येथे सकाळी ९.३० वाजता आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत तुळजापूर येथील केवडकर मंगल कार्यालयात सभा होणार आहे. दुपारी राखीव व त्यानंतर १.३० वाजता ही यात्रा तुळजापूर येथून उदगीरकडे प्रस्तान करणार आहे. या यात्रेदरम्यान खा. सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, खा. अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या यात्रेच्या तयारीसाठी धाराशिव येथे सोमवारी (दि.१२) राष्टÑवादी जिल्हा कार्यालयात आढावा पार पडली. या बेठकीत जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्ह्याचे नेते संजय निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच या यात्रेस सहभागी होण्याचे आवाहन केले. या बेठकीस जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जिल्हा नेते संजय निंबाळकर, मधुकर मोटे, अशोक जगदाळे, हबीबखान पठान, भालचंद्र बिराजदार, रणजित बारकुल, नरदेव कदम, बालाजी डोंगे, डॉ.ताडेकर, सुदन पाटील, शिवाजी सावंत, बाळासाहेब सरवदे, इकबाल पटेल, अरुण जाधव, धर्मराज पाटील, प्रा. मोहन बावरे, गणेश गडकर, गणपती चव्हाण, भारत शिंदे, महेश पडवळ, नानासाहेब जमदाडे, अमर गुंड, अजिंक्य हिबारे, शेखर घोडके, रणजित वरपे, शिवशांत काकडे, अनिल जाधव, खंडू भक्ते, बाहुबली देवधारे, ज्योति माळाळे, विठ्ठल माने आदी उपस्थित होते.