धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचे मार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिवस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.संदीप देशमुख यांनी बोलताना वरील उदगार काढले . आजच्या युवक पिढीने स्वामी विवेकानंद आणि शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे विचार आत्मसात करून आयुष्यामध्ये मार्गक्रमण केल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन आपण आपल्या ध्येयापर्यंत ,सहज  पोहोचू शकता. शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी 'ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार'  हे ब्रीद घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि आज महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील शिक्षणाचा मोठा वटवृक्ष निर्माण केला. त्यामुळेच आज आपण चांगल्या छताखाली बसून शिक्षण घेत आहोत. म्हणून आपण शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे ब्रीद आत्मसात करून मार्गक्रमण केल्यास जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की,क्लिक पासून विकासापर्यंत: शाश्वत विकासासाठी युवकांचे डिजिटल मार्ग   ही आंतरराष्ट्रीय युवा दिनाची यावर्षीची थीम असून, विद्यार्थ्यांना उपलब्ध असणारे डिजिटल मार्ग व त्यातून देशाची प्रगती व युवकांचा विकास कशाप्रकारे होते. यावर त्यांनी भाष्य केले.

   यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ.सावता फुलसागर हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माधव उगिले यांनी केले सूत्रसंचालन डॉ दत्तात्रय साखरे यांनी केले तर आभार डॉ अरविंद हंगरगेकर यांनी मानले.  सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.    सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

 
Top