धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) जिल्हा कार्यालय धाराशिव येथे (दि.15 )भारतीय स्वातंत्र्याचा 78 वा दिन मोठ्या उत्साहात उत्साहात साजरा करण्यात आला.
78 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.महेंद्र काका धुरगुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारत माता की जय चा जयघोष व देशभक्तीपर नारे देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक पक्ष कार्यालयामध्ये संविधान सभा आयोजित करण्यात आली.संविधान सभेमध्ये प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश बिराजदार आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थीत पदाधिकारी व सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, पदवीधर प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल,प्रदेश संघटक सचिव खलील पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दीन मशायक, सा.न्याय. धाराशिव शहर अध्यक्ष सचिन तावडे, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी, धाराशिव कळंब विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष ॲड.इंद्रजीत शिंदे, सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे,सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण, सेवा दल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव, माजी सैनिक विभाग जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, सामजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष नानासाहेब पवार, महीला जिल्हा कार्याध्यक्ष अप्सरा पठाण, धाराशिव शहर कार्याध्यक्ष मनोज मुदगल, सामाजिक न्याय शहराध्यक्ष विक्रम कांबळे,धाराशिव शहर महिला अध्यक्ष सुलोचना जाधव,धाराशिव युवक शहराध्यक्ष निहाल शेख, धाराशिव अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अरफात काझी, धाराशिव शहर उपाध्यक्ष अल्ताफ मुजावर, बेंबळी शहराध्यक्ष अतिश मरगणे,धाराशिव महीलाअल्पसंख्यांक शहराध्यक्षा आमिना शेख, ओबीसी सेल जिल्हा सचिव नारायण तुरूप,सा.न्याय जिल्हा सचिव राजाभाऊ जानराव, धाराशिव महिला तालुका कार्याध्यक्ष रुक्मिणी कुंभार,धाराशिव महिला तालुका उपाध्यक्ष उषा लगाडे, धाराशिव तालुका शहर सचिव सुजित बारकुल,आंबे जवळगा जि.प.गटप्रमुख सुरेश राठोड, वाघोली जि.प.महिला गटप्रमुख हज्जू शेख, चंद्रकांत लोमटे आदी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.