धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकरी मला भेटले. हक्काच्या पीकविम्याचे पैसे मिळत नसल्याची तक्रार केली. हक्काच्या पीकविम्याचा पैसा का मिळत नाही? असा प्रश्न उपस्थित करत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकाराशी बोलताना खंत व्यक्त केली. 

शिवस्वराज्य यात्रेनिमित्त खासदर सुप्रिया सुळे दि. 14 ऑगस्ट रोजी धाराशिव शहरात आल्या होत्या. शहरातील पुष्पक पार्क येथे थांबल्या. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने मराठा आरक्षणाबद्दल खासदार सुळे यांनी भूमिका स्पष्ट करावी. घोषणाबाजी करीत खासदार सुळे यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुळे यांनी मराठा आरक्षणाबाबतची सर्व म्हणणे ऐकून घेतले. पत्रकारांनी सुळे यांना विचारले असता मराठा आरक्षणाचा मुद्दा हा योग्य पध्दतीने सोडविला पाहिजे. सरकार म्हणून प्रश्न सोडविण्याची भूमिका घेणे आवश्यक होते. परंतु तसे झाले नाही. आम्ही सध्या विरोधीपक्षात आहोत असे खासदार सुळे यांनी सांगितले. आपला पक्ष राज्यात आपल्या किती जागा लढवणार यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता, महाविकास आघाडी म्हणून 288 जागा लढवणार आहोत. आमच्या समोर प्रामुख्याने महागाई, बेरोजगार व भ्रष्टाचार असे तीन मुख्य मुद्दे आहेत. हे सर्व सोडविण्यासाठी आगामी निवडणुकीनंतर महाविकास आघाडी पारदर्शक सरकार देईल. महाराष्ट्रात मोठ्या उद्योगपतीची गुंतवणूक आणण्यात येईल. सध्या राज्यावर जो अन्याय चालू आहे तो अन्याय महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मोडून काढण्यात येईल. असेही खासदार सुळे यांनी सांगितले. यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर उपस्थित होते.



दप्तर जळाले

मराठवाड्यात निजामाची राजवट होती. या लढ्यात निजामानी चिडून अनेक गावे व घराला आग लावली. त्यामुळे अनेकांचे वारसा दप्तर नाही असे सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार सुळे यांना सांगून जरांगे पाटील यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारला यश मिळाले आहे. मग आमच्या आरक्षणाबाबत भूमिका का स्पष्ट करत नाहीत असा प्रश्नही सकल मराठा समाजाच्यावतीने विचारण्यात आला. 


 
Top