धाराशिव (प्रतिनिधी)- बदलापूर येथील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी धाराशिव येथे बुधवारी (दि.21) जोरदार आंदोलन करुन महायुती सरकारचा निषेध करण्यात आला. लाडकी बहीण योजना राबविण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना राबविली असती तर महिला, मुली सुरक्षित राहिल्या असत्या, अशा तीव्र शब्दांत शहरात जागोजागी फ्लेक्सबाजी करणाऱ्या महायुती पदाधिकाऱ्यांवरही रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणा देऊन महायुती सरकार व अपयशी गृहमंत्र्यांचा निषेध आंदोलकांनी केला. सर्वसामान्य महिला, विद्यार्थिनी नागरिकांसह  महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.  

यावेळी बोलताना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, बदलापूर येथील घटना घडल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब गुन्हा नोंद करुन तात्काळ अटक करणे अपेक्षित होते. परंतु पक्षीय राजकारणात अडकून अशा गंभीर घटनांकडे दुर्लक्ष करत असाल तर अशा सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो. साडेतीन वर्षाच्या मुलीबाबत असे कृत्य करणाऱ्या कठोरात कठोर शिक्षा द्यायला हवी. जेणेकरुन भविष्यात अशा नीच घटना घडणार नाही. सहनशीलतेची मर्यादा संपल्यानंतर जनता गप्प बसणार नाही. त्यामुळे अशा घटनांसाठी कठोरात कठोर शिक्षेची तरतूद सरकारने करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेत एखाद्या नराधमाला पाठीशी घालण्यासाठी तब्बल 12 तास गुन्हा नोंद करण्यास उशीर केला. त्यामुळे जनक्षोभ उसळून सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. तेव्हा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे राज्य कोणाचे आहे? याचा सरकारने विचार करावा. एकीकडे विरोधकांनी प्रायोजित केलेले हे आंदोलन आहे असे सांगून तुम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे. त्यामुळे सरकारमधील लोकांनी आतातरी राजकारण बंद करावे. लाडकी बहीण योजनेऐवजी लाडकी बहीण, लाडकी लेक सुरक्षित राहावी यासाठी सरकारने काम करणे गरजेचे आहे. अशा घटना रोखण्यात गृहमंत्री आणि राज्य सरकार अपयशी ठरले आहे, असे यावेळी आमदार कैलास घाडगे-पाटील म्हणाले.

सक्षणाताई सलगर म्हणाल्या की, कोपर्डीच्या प्रकरणानंतरही सरकारला जाग आलेली नाही. तीन वर्षाच्या दोन चिमुरड्यांवर शाळेतच लैंगिक अत्याचार होत असेल तर अशा घटना महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या आहेत. याची जिम्मेदारी लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून ओरडणाऱ्या सरकारने घेतलीच पाहिजे. महिलांना 1500 नको आता सुरक्षितता हवीय. तीन वर्षाचे बाळही या सरकारच्या काळात सुरक्षित नाही. त्यामुळे गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. राज्यात ठिकठिकाणी घडलेल्या अशा घटनांमधील पीडितांना न्याय न मिळाल्यास आम्ही एकाही मंत्र्याची गाडी रस्त्यावर फिरु देणार नाही, असा इशाराही सलगर यांनी दिला.

यावेळी आंदोलनात सहभागी महिला, विद्यार्थिनींनीही अत्याचाराच्या घटनेचा निषेध करुन गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारबद्दल तीव्र रोष व्यक्त केला. त्यानंतर  गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले. 

आंदोलनात महाविकास आघाडीचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणाताई सलगर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजय सस्ते, तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, काँग्रेस (आय) तालुकाध्यक्ष विनोद वीर, श्याम जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, नितीन शेरखाने, राजाभाऊ पवार, सिद्धेश्वर कोळी, तुषार निंबाळकर, गणेश आसलेकर, पंकज पाटील, शहर संघटक प्रशांत साळुंके, उपशहरप्रमुख बंडू आदरकर, सुरेश गवळी,

प्रभाकर राजेनिंबाळकर, उत्तम कांबळे,  श्वेता दुरुगकर, शीलाताई उंबरे, ॲड.भाग्यश्री रणखांब, प्रीती कदम, संजना गायकवाड, मोनाली भोसले, आनंदी पाटील, सुवर्णा कांबळे, अफरोज पीरजादे, राकेश सूर्यवंशी, सुमित बागल, मुजीब काझी, जगदीश शिंदे, अमित उंबरे, संदिप शिंदे, महेंद्र शिंदे, रवि कोरे, बाळासाहेब मुंडे, हणमंत देवकते, पांडुरंग भोसले, अविनाश शेरखाने, अभिजित देशमुख, प्रशांत जगताप, छोटा साजीद, सतीश लोंढे, गणेश साळुंके, अभिराज कदम, दिनेश बंडगर, सह्याद्री राजेनिंबाळकर, अजिंक्य राजेनिंबाळकर, गणेश राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, ॲड.शिवयोगी चपने, गफार काझी, नाना गरड, नाना घाटगे, मुकेश पाटील, सौदागर जगताप, चंद्रकांत गायकवाड, सुनील वाघ, पिंटू आंबेकर, यशवंत शहापालक, धनंजय इंगळे, कलीम कुरेशी, दीपक पाटील, प्रवीण केसकर, सुधीर अलकुंटे, साबेर सय्यद, अमोल मुळे, सत्यजित पडवळ, महेश लिमये, ओंकार बांगर, योगेश गरड, मुकेश चौगुले, युवराज पवार, अमित जगधने, प्रसाद पाटील, चेतन वाटवडे, मनोज पडवळ यांच्यासह नागरिक, महिला, युवती, विद्यार्थिनी व महविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top