तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघातुन आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिग्रेड जिल्हाअध्यक्ष मराठा सेवक शरद शालिनी हरिदास पवार रा. सुरतगाव ता तुळजापूर यांनी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे जावुन अर्ज देवुन उमेदवारीची मागणी केली आहे.
यावेळी मागणी अर्जात त्यांनी म्हटलं आहेकि, मी जगदंब प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,शिवसेवा गडसंवर्धन मोहीम संस्थापक अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष धाराशिव, रायगड वारी (शिवराज्याभिषेक सोहळा) संस्थापक या पदावर काम करुन मराठा समाजाची सेवा करित आहे. माझे शिक्षण एम समाजशास्त्र / मराठी झालेले आहे.
मी 2006 पासून ते आज 2024 पर्यंत मी विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून या मतदारसंघांमध्ये काम केले आहे. व मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता वेळोवेळी आंदोलने उपोषण केले आहे. माझ्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदार संघाच्या प्रत्येक गावामध्ये पोहोचलो आहे तसेच गतवर्षापासून राजकीय क्षेत्रात काम करत आहे. त्यानिमित्ताने माझ्या मतदारसंघातील 213 मतदान केंद्रापैकी 122 मतदार केंद्रावर माझी बूथ कमिटी तयार आहे. 1 बूथ 11 युथ हा कार्यक्रम मी माझ्या तुळजापूर मतदारसंघात राबवला आहे. मी सामाजिक कार्याच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते पदाधिकारी या निमित्ताने जोडले आहेत. मतदार संघातील मराठा संघटना व इतर जातीतील संघटना यांच्या प्रमुखांची माझे व्यक्तीशा चांगले संबंध आहेत. शिवाय निवडणुकीसाठी लागणारी यंत्रणा उपलब्ध आहे व मागील निवडणुकीमध्ये स्टार प्रचारक म्हणून काम केल्यामुळे यंत्रानेचा अनुभव आहे. जर आपण मला ही उमेदवारी द्याल तर मी या मतदारसंघातून 100% निवडून येऊ शकतो. या सर्व बाबीचा सारासार करून व मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढाईचा सामान्य कार्यकर्ता म्हणून तुळजापूर मतदारसंघाची उमेदवारी मला द्यावी अशी मागणी केली आहे.