धाराशिव (प्रतिनिधी )येथील लहुजी शक्ती सेना आणि मातंग समाजाच्या वतीने लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष  विष्णू भाऊ कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती मध्ये प्रवर्ग अ ब क ड आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या निर्णयाचे पेढे वाटून अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर राज्य सरकारने कोर्टाच्या निर्णयात बद्दलची तात्काळ अंमलबजावणी करावी आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये अ ब क ड आरक्षण वर्गीकरण करावे या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड यांनी या आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्यांचा तिव्र शब्दांमध्ये निषेध केला.  याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, प्रदेश प्रवक्ता प्रा.डॉ. मारुती लोंढे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष मोरे, जिल्हा सचिव सुभाष गव्हाळे विद्यार्थी आघाडी, जिल्हा कार्याध्यक्ष अजय पेठे, लहुजी कंपनीचे संस्थापक अध्यक्ष कुमार कांबळे, अंकुश पेठे, मिलिंद पेठे, तानाजी कांबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top