तेर (प्रतिनिधी)-डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय धाराशिव व स्विसेड प्रकल्प यांच्या वतीने धाराशिव तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालय  येथे  बालविवाह प्रतिबंध कायदा जनजागृतीपर विधी साक्षरता शिबिर  आयोजित करण्यात आले होते.                 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र संत विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.के.बेदरे होते.यावेळी बालविवाह प्रतिबंधक कायद्याविषयी कृतिखेलाद्वारे मार्गदर्शन  विद्यार्थिनींना करण्यात आले. यावेळी डॉ. संजय आंबेकर, एस एस.पाटील,  चव्हाण लक्ष्मण यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता म्हणून श्रुती जाधव हिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आरती जाधव,गौरी ढोबळे, ऋतुजा तावरे यांनी संवादद्वारे बालविवाह विषयी माहिती दिली. सानिया पठाण हिने बालविवाहवर कविता सादर केली.सूत्रसंचलन अपूर्वा फासे हीने केले. कार्यक्रमाचे आभार तनिष्क कुंभार  यांनी मानले.यावेळी सुदर्शन ढोबळे, चैतन्य ढोबळे, बालाजी गुरव, अपेक्षा माळी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.

 
Top