परंडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद  प्रशाला (मुले) जिल्हा परिषद कन्या प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद इंदिरा वस्ती प्राथमिक शाळा या शाळांनी हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत परंडा शहरातून रॅली काढण्यात आली.

रॅलीमध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा घरो, घरी तिरंगा फडकावू प्रत्येक घरात तिरंगा फडकावूया अशा आशयाच्या घोषणा देण्यात आल्या. आय लव माय इंडिया, ये मेरा इंडिया, ए मेरे वतन के लोगो, मेरे देश के धरती सोना उगले  इत्यादी देशभक्तीपर गीते सादर केली. सर्व प्रशालेतील मुलांनी रॅली मध्ये उस्त्फुर्त सहभाग नोंदवला.

यावेळी जिल्हा परिषद प्रशाला (मुले)मुख्यध्यापक रामचंद्र इंगळे, कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक ,दिनकर पवार, उर्दू प्रशालेचे मुख्याध्यापक अहेमद खतीब, उर्दू प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका यास्मीन सय्यद, जिल्हा परिषद इंदिरा वस्ती शाळेचे मुख्याध्यापक दत्ता कुमरे सहशिक्षक आप्पासाहेब बल्लाळ, भाऊसाहेब सुर्यवंशी, सतीश खरात, नामदेव पखाले जमील बांगी, नितीन लोधवाल, महेश शिंदे, शशी माने, तानाजी मिसाळ, नारायण शिंदे, समीना दखनी, यास्मीन पंजेशा, रुक्साना  विजापुरे, शबाना काझी, बाबुधी घाडगे, शुभांगी देशमुख , मीनाक्षी मुंढे ,रेखा उसराटे,अंजली चंदनशिवे, गीता मांडलिक हे या रॅली मध्ये सहभागी झाले होते.

सर्व प्रशालेतील मुला मुलींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त निबंध लेखन केले. रामचंद्र इंगळे यांनी हर घर तिरंगा उपक्रमाचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब सुर्यवंशी, नितीन लोधवाल, महेश शिंदे यांनी केले.

 
Top