धाराशिव (प्रतिनिधी) - प्रसिद्ध नाट्य व चित्रपट अभिनेते विजय कदम यांचे शनिवार 10 ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाले. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा धारााशिवच्या वतीने शनिवारी दुपारी शाखा कार्यालयात कदम यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी नाट्य परिषद शाखा धारााशिवचे प्रमुख कार्यवाह धनंजय शिंगाडे, अध्यक्ष विशाल शिंगाडे, डॉ. अभय शहापूरकर, राजेंद्र अत्रे, धनंजय कुलकर्णी, सागर चव्हाण , सुगत सोनवणे, सतीश ओव्हाळ, शशीकांत माने, प्रसेनजित शिंगाडे, विजय उंबरे, यशवंत शिंगाडे, ताहेर शेख उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचा धाराशिव शाखेशी विशेष संपर्क होता. शाखेच्या विविध उपक्रमांच्या आयोजनात त्यांचे मौलिक मार्गदर्शन केले असल्याचे अखिल भारतीय नाट्य परिषद नियमक मंडळाचे सदस्य तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेचे धाराशिव शाखाध्यक्ष विशाल शिंगाडे यांनी सांगितले.
नाट्य परिषदेच्या धाराशिव शाखेच्या वतीने कदम यांच्या निधनामुळे पाच दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे धाराशिव शाखेच्या वतीने 100 व्या नाट्य संमेलनानिमित्त 15 ते 18 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. दुखवटा संपल्यानंतर कार्यक्रमाच्या पुढील तारखा जाहीर करण्यात येणार असल्याने याची संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिंगाडे यांनी केले आहे.