परंडा (प्रतिनिधी) - कोलकाता येथील आर. जी. कार मेडिकल पदवीधर महिला डॉक्टर वर क्रूरपणे बलात्कार व हत्या.निषेधार्थ परंडा तालुक्यातील सर्व  वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारला बंद तर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे काळेफिती लावून रुग्णसेवा दिली.

कोलकाता येथील आर जी कार मेडिकल पदवीधर महिला डॉक्टर वर क्रूरपणे बलात्कार व हत्या. 

निषेधार्थ परंडा तालुक्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी पुकारलेल्या बंद बाबत परंडा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दि.9 ऑगस्ट 2024 च्या पहाटे कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या पदवीधर महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली. यामुळे फक्त वैद्यकीय क्षेत्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे डॉक्टर्स च्या कामाच्या ठिकाणच्या सुरक्षेचा अतिमहत्वाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तेव्हापासून फार पूर्वीपासून प्रलंबित सुरक्षे संदर्भातील न्याय्य मागण्यांसाठी निवासी डॉक्टर्स देशव्यापी संपावर गेले आहेत. देशभरातील डॉक्टर्सच्या अनेक संघटनां वतीने ही देशभरात निदर्शने आणि कँडल मार्च काढण्यात आले आहे.

आर जी कार महाविद्यालतील अधिकाऱ्यांनी गुन्ह्याची परिस्थिती अतिशय हलगर्जीपणे, निष्काळजीपणे हाताळली आणि पहिल्या दिवसानंतर तर पोलिस तपासही जाणिवपूर्वक रखडवला गेला जेणेकरून या प्रकरणातील हाय प्रोफाईल गुन्हेगार सुटतील. मात्र अखेर 13 ऑगस्ट 2024 रोजी, कोलकाता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आतापर्यंतच्या तपासावर असमाधान व्यक्त करून हे प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्युरो () कडे सोपविण्यास सांगितले आहे. राज्य पोलिसांनी त्यांचा तपास सुरू ठेवल्यास पुरावे नष्ट होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.15 ऑगस्टला आपल्या स्वातंत्र्यदिनी जेव्हा आपण सर्व देशवासी आनंद साजरा करीत होतो त्याच दिवशी मोठ्या जमावाने या रुग्णालयाच्या विविध विभागांची फक्त तोडफोडच नाही केली तर ज्या सेमिनार रुममध्ये पिडीत निवासी डॉक्टर चा निघृण बलात्कार व हत्या केली गेली तेथील पुरावेही नष्ट करण्याचा प्रयत्न ह्या जमावाने केला.एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही हल्ला केला. एवढे अपुरे होते की काय भरती असलेल्या रुग्णांना तसेच भरती रुग्णांसाठी लागणाऱ्या साधनसामग्री ला सुध्दा प्रचंड मोठी क्षती पोहोचविली. डॉक्टर्स विशेषतः स्त्री डॉक्टर्स हिंसाचाराला वारंवार बळी पडतात. रुग्णालये आणि कॅम्पसमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेची तरतूद करणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. मात्र डॉक्टर्स च्या सुरक्षेबाबत संबंधित ह्या अधिकाऱ्यांच्या उदासीनता आणि असंवेदनशीलतेमुळेच डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवर वारंवार शारीरिक हल्ले होतात, रुग्णालयामध्ये राडे होत राहतात.कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमधील स्री निवासी डॉक्टर वर झालेल्या क्रूर गुन्हेगारी आणि स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या पार्श्वभूमीवर, मेडिकल असोसिएशन ऑफ परंडा या परंडा तालुक्यातील सर्व डॉक्टर्सच्या संघटनेने शनिवार दि. 17 ऑगस्ट 2024 निषेधदिन पाळून सकाळी 6 वाजेपासून ते उद्या रविवार दि.18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांसाठी सर्व क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स मधील सेवा बंद ठेवण्याची घोषणा केली होती. सर्व अत्यावश्यक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आले होते. अपघातग्रस्तांना आकस्मिक सेवा दिली गेली.परंतु नियमित ओपीडी कार्य करण्यात आली नाहीत.आणि वैकल्पिक, तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रियाही केल्या जाणार नाहीत.असे पुर्व सुचना रुग्णांना देण्यात आले होते. भारत देशातील सर्व डॉक्टर्सना आपल्या डॉक्टरांच्या न्याय्य मागण्यांसाठी देशाची सहानुभूती हवी आहे.  अशा मागण्यांची निवेदन व निदर्शने करत डॉक्टरांनी व सर्व कर्मचारीवृंद उपजिल्हा रुग्णालय येथे काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली.  याप्रसंगी निषेध व्यक्त करण्यासाठी व श्रद्धांजली वाहण्यासाठी परंडा शहरातील व तालुक्यातील आणि उपजिल्हा रुग्णालय परंडा येथील सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.

 
Top