धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व श्री श्री रविशंकर विद्यामंदिर उमरगा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री श्री रविशंकर विद्यामंदिर उमरगा येथे 17 ते 18 ऑगस्ट दरम्यान आयोजित जिल्हास्तर ज्युनिअर ॲथलेटिक्स (18,20 वर्षाखालील मुले/मुली) च्या स्पर्धेचे आमदार ज्ञानराज चौगुले, कार्यक्रमाचे व श्री श्री रविशंकर विद्यामंदिर उमरगा संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय मोरे यांच्या हस्ते उ्घाटन करण्यात आले.
यावेळी ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे संचालक अभिजित माडिवाले,जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव योगेश थोरबोले,सहसचिव राजेंद्र सोलंकर,ज्येष्ठ क्रीडा शिक्षक संजय कोथळीकर,मुनीर शेख,सुशील बदोले ,मुख्याध्यापक कुलकर्णी सर,सगर सर, कमितकर सर इत्यादी उपस्थित होते.या स्पर्धेत जिल्ह्यातील 363 मुल व मुलींनी सहभाग नोंदवला आहे.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या मनोगतात त्यांनी आजच्या आधुनिक काळात ग्रामीण भागातील मुलांना योग्य संधी व दिशा मिळाल्यास ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे नाव उज्ज्वल करतील. तसेच मोबाईलचा वापर सोडून आजची तरुण पिढी मैदानावर आली त्याबद्दल समाधान व्यक्त केले व जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे कौतुक केले. तसेच भविष्यात ॲथलेटिक्स क्या राज्य स्पर्धा उमरगा येथे आयोजित करण्याचा प्रयत्न करू व जास्तीत जास्त खेळाडूंना प्रोत्साहन, साहित्य उपलब्ध करू असे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय मोरे यांनी आपल्या मनोगतात शाळेचे मैदान,क्रीडा साहित्य जिल्ह्यातील खेळाडूंना सरावासाठी किंवा स्पर्धा आयोजित करण्यासाठी विनामूल्य उपब्धत करू असे आश्वासन दिले. या स्पर्धेचे पंच म्हणून शेंडगे, चांद शेख,योगिनी साळुंखे इत्यादी पाहत आहेत.