उमरगा (प्रतिनिधी)- शहरातील महाराष्ट्र गणेश मंडळाच्या गणेशोत्सव कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी प्रणव देशमुख, उपाध्यक्ष शुभम माळी, सचिव गणेश पाटील, खजिनदार अर्जुन चेंडके व निखिल महाकाली यांची निवड करण्यात आली.

गणेश चौक येथे  मंडळाचे आधारस्तंभ बसवराज हिरेमठ स्वामी सर यांच्या अध्यक्षतेखाली गणेश उत्सव समिती बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आजोबा गणपतीच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक सामाजिक प्रबोधन पर कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, व्याख्यानमाला, उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची  असे विविध कार्यक्रम आयोजन केले जाते. यावर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी प्रकाश शिरगुरे, आकाश इढे, प्रशांत शिरगुरे, पंकज अलगुडे, कृष्णा कांबळे, गोविंद  हळीखेडकर, शंतनु हळीखेडकर, मंगेश चिंचोलीकर, मोहन पांचाळ, विकास देशमुख, सोहम शिरगुरे, संकेत साठे, आकाश क्रोमले, धनराज कांबळे सर्व सदस्य उपस्थित होते.


 
Top