धाराशिव (प्रतिनिधी)-मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार (दि1 ऑगस्ट)रोजी जिल्हाभर रेकॉर्ड ब्रेक विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी 09:00 वाजता आई तुळजाभवानी देवीला अभिषेक व महाआरती करण्यात आली , साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अण्णाभाऊ साठे चौकात पुष्पहार अर्पण करून अन्नदान करण्यात आले हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाझी दर्गा चादर चढवून फळे व अल्पोपहार वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक रक्तदान शिबीर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन केले 1001 वृक्ष वाटप व वृक्षारोपण करण्यात आले महाराजांच्या पुतळ्याजवळ रक्तदान शिबिर ,धाराशिव येथील नगर पालिका शाळेत गरजवंत विदयार्थ्याना शालेय साहित्य वाटप करून येडशी येथील रामलिंग महाराज मंदिर मध्ये अभिषेक करण्यात आला राजमाता जिजाऊ चौक येथे सर्वांसाठी अल्पदरात (100रु)पॅनकार्ड काढून देण्यात आले भानासगाव- सोनेगाव- करी - अंबेजवळगे या चौरस्त्याचे नामकारण संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील चौक करण्यात आले खेड ता. जि धाराशिव रक्तदान शिबिर घेण्यात आले.
याशिवाय जिल्ह्यात अनेक ठिकाणी अभिषेक,महाआरती,रक्तदान शिबिर वृक्षारोपण ,विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप , रुग्णांना फळे व खाऊ वाटप सह विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे जिल्हाभरातून सांगण्यात येत आहे. वाढदिवसाच्या सामाजिक उपक्रमात जिल्हाभरातील सकल मराठा समाज बांधवांनी हिरीरीने सहभाग नोंदवून भव्य दिव्य कार्यक्रम राबवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.